Wardha सचिन वाघे प्रतिनिधी
हिंगणघाट :- माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिला परिषद वर्धा , यांचे पत्र क्रमांक शिक्षण/सशिअ/307/202. दिनांक: 14 /11/2022 अनव्ये नगर परिषद, हिंगनघाट Hingnghat द्वारे शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलाना शालेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी नगर परिषदे तर्फे कलोडे भवन जवल ,वडर वस्ती कारखाने व बांधकामाचे क्षेत्र ,स्टेशन फैल ,वस्ती कारखाने व बांधकाम क्षेत्र, वीट-भट्टी क्षेत्र ,बस स्टॉप जवडील क्षेत्र , कारखाने व बांधकामाचे क्षेत्र व नंदोरी रोड व नागपुर Nagpur रोड वरील कारखाने व बांधकाम क्षेत्र ,विट-भट्टी क्षेत्रामध्ये जावुन ,दिनांक 20 नोव्हेबर 2022 ते दिनांक. 5 दिसेंबर 2022 या कालावधी मध्ये सर्वेक्षण करण्या साठी श्री हर्षल गायकवाड मुख्य अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांची आदेशानुसार श्री प्रवीण काळे प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग नगर परिषद हिंगनघाट
यांचा नियंत्रणामध्ये श्री निलेश शिंदे प्रशासकीय अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांच्या देखरेखे खाली, शहर मध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असुन नगर परिषदेतर्फ या कामासाठी मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक नगर परिषद प्राथमिक शाला नगर परिषद हिंगनघाट ,यांच्या वति ने सहायक शिक्षक व शिक्षिका कल्पना कारामोरे, अरविंद निमजे, छाया राईकवार ,पिंकी बघेल, आरती माहुरे, एस के मस्के, सुनीता भूमर नीलिमा तेलतुंबरे, विजय बोरकर, कविता चौहान, प्रेमकुमार पालीवाल , मीना आडकीने यांच्या मार्फत मोहिम राबविण्यात येत असून. दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ,रोजी कचरा वेचणायांचे पाल्य ,संत ज्ञानेश्वर वार्ड, रिठे काँलोनी परीसरमध्ये एकुण 9 शाळाबाह्य विद्यार्थी आढलुन आले,त्या विद्यार्थियांना जवळील शहालंगड़ी प्राथमिक शाळा हिंगनघाट.
येथिल शाळेत दाखल करण्यासाठी तेथिल मुख्याध्यापक श्री सिंगोटे, कविता घोड़े (विषय तज्ञ) ,सुनीता गजभिए (बालक संरक्षक) पंचायत समिति हिंगनघाट व नगर परिषदे तर्फे प्रवीण काळे, प्रशासन अधिकारी (शिक्षा विभाग) नगर परिषद हिंगनघाट. प्रेमकुमार पालीवाल सहायक शिक्षक, श्रद्धानंद हिंदी प्राथमिक शाला ,कविता चौहान व मीना आडकिने सहायक शिक्षिका लोकमान्य तिलक नगर परिषद प्राथमिक शाळा हिंगनघाट
यांचा उपस्थिति विद्यार्थियांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी दाखल करण्यात आले.तसेण ईतर शहरामधे कुठे शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आल्यास श्री मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक यांच्या दूरध्वनी क्रमांक: 9970566880 या वर माहिती देण्याचे आव्हान करण्यात येत आहे.