धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई येथे रंगले कवी संमेलन

 

(मुंबई / पवई प्रतिनिधी )

धम्म चक्र प्रवर्तन मंडळ आयोजीत धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने अंधेरी (पुर्व) विधानसभेचे कोषाध्यक्ष माणिक ओव्हाळ यांनी कवी शाम बैसाणे यांच्या सहकार्याने त्यांच्या स्थानिक ठिकाणी महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई सार्वजनिक कट्टयावर काव्य संमेलन आयोजित केले होते.
या कार्यक्रमाला निमंत्रित कवी म्हणून जीवनसंघर्षकार कवी लेखक नवनाथ रणखांबे , कथा कादंबरीकार लेखक कवी भटू जगदेव , कवी शाम बैसाणे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि आंबेडकरी चळवळीच्या परिवर्तनवादी दर्जेदार कविता सादर केल्या. महात्मा फुले नगर करानी देखील जोरदार टाळ्यांच्या गजरांनी आणि मोठ्या उत्साहाने कवितांना दाद दिली. महिलांनी देखील कवितांना उत्तम प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धम्म चक्र प्रवर्तन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माणिक होवाळ, अध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष राजू शिवसरन, सचिव संघसक्षक मोरे, उपसचिव रमेश पाल, सल्लागार अरुन झोडगे यांनी मेहनत घेतली .
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर बसवंत गाडगे , अंधेरी विधानसभा प्रभारी कुंदन वाघमारे, मनोहर रत्नपारखे, महेंद्र कानोजिया, ऍड. प्रणाली पाते, सखा धबाले, अंजना शाम बैसाणे , संदीप पाटील, संजना संदीप पाटील उपस्थित होते. जेष्ठ नेते बसवंत गाडगे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.

Leave a Comment