माननीय श्री रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधार मध्ये आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पेशनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किमतीत मिळावी. भारतातील ६०% लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाही पण ८५ ते ९०% औषधें ही भारतातच बनतात ज्यांना जेनरिक म्ह्टले जाते. त्यामुळे जेनरिक औषधे किमत कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.
येत्या काही महिन्यात जेनरिक आधार चे केंद्र फक्त मुंबई – पुणे नाही तर सांगली, सातारा, मिरज आणि कोल्हापूर, महाराष्ट्राच्या व देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास अर्जुन ने आपल्या हाती घेतला आहे….