देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंती निमित्ताने सलग 27 व्या वर्षी मूख्य अभिवादनासह जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

 

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती व आझाद हिंद संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने वतीने करण्यात आले आहे.

23 जानेवारी 2023 ला स्थानिक भारतीय स्वतंत्रता स्मारक (अक्षय वटवृक्ष) येथे सकाळी ११.३० वाजता मुख्य अभिवादन आणि मानवंदना कार्यक्रमाने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्सवाला प्रारंभ होणार आहे.

तर त्यानंतर देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या आयोजनानुसार देशभक्तीपर व्याख्यान, कवी संमेलन, स्पर्धा, गरजवंतांना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप, अन्नदान , वैद्यकीय कॅम्प, यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सुभाष बाबूंच्या त्याग आणि समर्पणाला वंदन करण्यासाठी केंद्र सरकार ने पराक्रम दिवस साजरा करण्याचे अध्यादेश तीन वर्षांपूर्वी पारित केले आहे. त्यामुळे काही राज्यातील अपवाद वगळता देशातील प्रत्येक मुख्यमंत्री यांनी त्या अनुषंगाने शासकीय, निमशासकीय कार्यालयांना जयंतीसह पराक्रम दिवस साजरा करण्याचे आदेशही काढलेले आहे.

त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालय, सुरक्षा विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासह शाळा, कॉलेज, बँक, संस्था, पतसंस्था, यांना देशगौरव नेताजींना राष्ट्रगीत म्हणत मानवंदना देणे क्रमप्राप्त आहे.

तर नेताजींना मानवंदना न देणारे शासकीय, निम शासकीय कार्यालय, संस्था शासन, प्रशासनासह आझाद हिंदच्याही रडारवर राहतील असा ईशारा देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती.2023 व आझाद हिंद संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Comment