देवरी SBI शाखा प्रबंधकाची ग्राहकाला दिली धमकी, ग्राहकाने केली तक्रार

 

देवरी,दि.10ः-: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा प्रबधंकाच्या व्यवहाराने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून शाखा प्रबधकांच्या वाढलेल्या दादागिरीमुळे बँकेची पत घसरू लागली आहे.तालुक्यातील एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा असलेल्या देवरीतील बँकेत जनता बहूउद्देशीय संस्था द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरतोली/ लोहाराचे खाते आहे.खातेदार संस्थेचे संचालक राजकुमार मडामे यांनी नागपूर विद्यापीठाला डीडीच्या माध्यमातून द्यावयाच्या रकमेसाठी महाविद्यालयीन कामकाजाचे डिमांड ड्राफ बनविण्याकरीता २४ ऑगस्ट २०२० रोजी ३१५०रु २८२१ रु व ७५०रुपयाचे चेक दिले.त्याच दिवशी त्या रकमेचे डीडी देणे बंधनकारक असताना बँक प्रबंधकाने मात्र डीडी तयार न करता आधी आणलेली रोख नाकारत चेक मागितले.चेक दिल्यानंतरही २४ ते ३० ऑगस्ट पर्यंत डीडी न देता जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत ३१ ऑगस्टला फोन करून डीडी दिली.शिक्षण संस्थाचालकाला डीडी उशीरा मिळाल्यामुळे रा.तू .म विद्यापीठाने ७०००रु चे अतिरिक्त शुल्क महाविद्यालयाला भरावयास भाग पडले.वेऴेवर डीडी न मिळाल्यामुळे आपणावर भुर्दंड बसल्याचा शाखा प्रबंधकाला विचारले असता सदर बँक प्रबंधकाने दादागिरी करत खातेदार असलेल्या ग्राहकालाच शिविगाळ करीत बँकेतून बाहेर काढण्याची धमकी देत ग्राहकाचा अपमान केला. या सर्व प्रकरणाची तक्रार खातेदार असलेले संचालक राजकुमार मडामे यांनी नागपूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य प्रबधंकाकडे केली असून त्यावर काय कारवाई केली जाते,याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे यापुर्वीही तत्कालीन आमदार संजय पुराम यांनीही एकदा सदर प्रबंधकाची कानउघाडणी केली होती,त्यानंतरही त्यांच्यात काहीही सुधारणा झालेली दिसून येत नाही.

Leave a Comment