शेगाव अर्जुन कराळे
बुलढाणा:
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नीत डिजीटल मिडीया परिषदेच्या शेगांव तालुका कार्यकारणीचा सत्कार, आधी बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनात करण्यात आला, जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने हा सत्कार झाला.
यानंतर समृध्दी महामार्गासाठी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केलेल्या कार्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या दालनात त्यांचा सत्कार करण्यात आला.
अगदी सुरुवातीच्या काळात दिनेश गिते यांनी नायब तहसीलदार म्हणून शेगावला सेवा दिलेली असल्यामुळे, शेगावचे पत्रकार आल्याचे पाहून त्यांनी शेगाव डिजीटल कार्यकारणीचाही पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यावेळी शेगाव विकास आराखड्यात तिथल्या स्थानिक पत्रकारांनी बजावलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे काम करण्यास आनंद मिळाल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले.
डिजीटल मिडीया परिषदेची पहिली कार्यकारिणी बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात गठीत झाली. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून सचिन कडूकार यांची निवड करण्यात आली. तर त्यांच्यासोबत कार्यकारणीत उपाध्यक्ष अर्जून कराळे, नारायण दाभाडे, रवी शेगोकार, सुभाष वाकोडे, सागर शिरसाट, शेख ईस्माइल, सुरज देशमुख यांचा समावेश आहे.
या डिजीटल मिडीया कार्यकारणीचा सत्कार बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, सरचिटणीस संदिप शुक्ला, सचिव शे.कासीम, ज्येष्ठ पत्रकार संजय मोहिते व राजेंद्र काळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष लहाने, प्रसिध्दी प्रमुख संदिप वानखेडे आदींच्या हस्ते कर ण्यात आला.
समृध्दी महामार्गासाठी राज्य शासनाने गौरविल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांचा सत्कार बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह शेगाव तालुका डिजीटल मिडीया परिषदेचे पदाधिकारी व पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, सरचिटणीस संदिप शुक्ला, शेख कासीम, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल अंबरकार, धनराज ससाने, तथा शेगांव तालुक्यातील सचिन कडूकार, अर्जून कराळे, रवी शेगोकार, सुभाष वाकोडे, सागर शिरसाट, नारायण दाभाडे, शेख ईस्माइल, सुरज देशमुख यांचेसह अनेक पत्रकार उपस्थित होते.