सिंदखेड राजा ( सचिन खंडारे
सिंदखेड राजा तालुक्याची सीमाभाग लगत आणि देऊळगाव राजा तालुक्यात येत असलेल्या डिग्रस हे गाव या गावानजीक पूर्णा नदी वाहते या नदीत असलेली रेती अक्षरशः अवैध रेती तस्करासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेली आहे या घाटात हजारो ब्रास असा नंबर एकचा रेती साठा प्रचंड आहे मात्र या भागात असलेल्या रेती तस्कराच्या दहशतीमुळे अद्याप पर्यंत या घाटाचा लिलाव झालेला नाही अर्थात कोणी हा घाट घ्यायची हिंमत दाखवत नाही या रेती घाटावर जाण्यासाठी तस्करानी अनेक चोरटे रस्ते बनविलेले असल्याने महसूल प्रशासनाला रेतीच्या गाड्या पकडणे फार अवघड झाले आहे घर का भेदी लंका ढाके या उक्ती प्रमाणे महसूल विभागातील काही कर्मचाऱ्याचे अर्थपूर्ण लागेबांधे या तस्करासोबत असल्याने साहेब येणार आहेत साहेबाचे लोकेशन माहिती याची टीप लगेच तस्करांना मिळत असल्याने या रेती तस्करांच्या मुसक्या आवळने पर्यायी अवैध रेती उत्खनन बंद ठेवने हे सर्वात मोठे आव्हान महसूल विभागा समोर उभे असून जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाने जर संयुक्त कारवाई केली तरच या घाटावरीलअवैध रेती तस्करी बंद होऊ शकते अन्यथा या तस्करांच्या मुसक्या आवळने प्रशासनासमोर एक आव्हानच राहनार आहे
महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून या डिग्रस घाटातुन बिनबोभाटपणे अवैध रेती तस्करी सुरू असते देऊळगाव मही ते मलकापूर पांग्रा रस्त्यावर देऊळगाव मही पासून थोडया अंतरावर आडवळणी डिग्रस हे गाव आहे या गावात रेती तस्कर ठाण मांडून बसले आहेत गावात जवळपास चाळीस ते पन्नास अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर गाड्या आहेत रेती घाटावर जाण्यासाठी रेती तस्करांनी अनेक छुपे मार्ग बनवले आहेत येथील रेती घाटाचा लिलाव न झाल्याने या पॉईंट वर महसूल विभागाने एक तलाठी दोन कोतवाल ऑन ड्युटी तैनात ठेवले आहेत संध्याकाळी सहा वाजता त्यांची ड्युटी संपली की तलाठी घरी जातात आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होते रेती तस्करीला सुरुवात तलाठी घरी गेले की सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान रेती घाटावर स्टॉक केलेली रेती टिप्पर मध्ये जेसिबी च्या साह्याने भरल्या जाते त्यानंतर रेतीच्या गाड्या विक्री साठी पाठविल्या जातत् त्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान रेती तस्कर नदी पात्रात किनी असलेले ट्रॅक्टर लावून सकाळी तीन वाजेपर्यंत रेती पाण्यातून उपसून बाहेर काढून नदी काठावर त्याचा पुन्हा साठा केल्या जातो त्यानंतर सकाळच्या चार वाजे दरम्यान रेती जेसीबी द्वारे टिप्पर मध्ये भरून पुन्हा त्या गाड्या रेती विक्री साठी पाठविली जातात या रेती तस्करा कडे स्वतःच्या गाड्या आणि त्या भरण्यासाठी स्वतःच्या जेसीबी मशीन तसेच रेती बाहेर काढण्यासाठी किनी असलेले ट्रॅक्टर स्वतःचेच आहेत प्रत्येकाची यंत्रणा स्वतंत्र असल्याने अवैध रेती तस्करीला मोठ्या प्रमाणात सुरु होते गाडी भरून पाठवले की त्या गाडीच्या समोर तस्कराचे चार चाकी वाहन जीप जाऊन थांबते आणि समोर कोणी अधिकारी आला आहे का याची खातरजमा केली जाते लोकेशन घेतले जाते आणि कोणी तहसीलची गाडी आली की लगेच मोबाईलद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकास त्या संदर्भात माहिती दिले जाते तर काही ठिकाणी महसूल कर्मचारी समोर साहेब आहेत आता येऊ नका असा मेसेज रेती तस्कराना देतात त्यामुळे रेती तस्कर चा धंदा बिनधास्तपणे सुरू असतो या अवैध रेती उत्खनमुळे मुळे पर्यावरणाची तर मोठ्या प्रमाणात हानी तर होतेच मात्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडत आहे या रेती तस्करांनी कायद्याचा लाभ उठवत उपसा केलेल्या रेतीचा साठा शासकीय जमिनीवर करून ठेवतात त्यामुळे जर एखाद्या वेळी महसूल विभागाने अवैध साठा केलेली रेती पकडली तर तिचा मालक कोण आहे तो भेटत नाही त्यामुळे कुणावर गुन्हा दाखल होत नाही त्यामुळे रेती तस्कर कायद्याच्या चपाट्यातून निसटून जातात आणि पर्यायाने महसूल विभाग त्या साठवलेल्या रेतीचा लिलाव करतात त्यामुळे सदर रेती तस्कर त्या लिलाव केलेल्या रेतीची हर्रशी घेऊन त्या पावतीवर पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी करतात या नदीवर रेती तस्करीसाठी 2 ते 3 पॉईंट आहे त्यामुळे महसूल विभागाने कितीही पकडण्याचे प्रयत्न केले तरी हे तस्कर जाळ्यात येत नाहीत त्यामुळे डिग्रस पॉइंट रेेती च्या तस्करी साठी सोन्याची अंडे देणारी कोंबडी ठरला आहे या ठिकाणी रेती अवैध रेती तस्करच्या मुसक्या आवळण्यासाठी एकट्या-दुकट्या कर्मचाऱ्यांचे काम नसून त्यासाठी पोलीस विभाग आणि महसूल प्रशासनाच्या टीम ने संयुक्तरित्या कारवाइ केली तरच खर्या अर्थाने रेती तस्करी बंद होऊ शकते अन्यथा महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून अवैध रेती तस्करी बिनधास्तपणे आणि बिनबोभाटपणे सुरूच राहील यात तिळमात्र शंका राहनार नाही
Box
तलाठ्याने दिली रेती तस्कराला पत्रकार आल्याची माहिती
दिग्रस रेतीघाट पॉइंटवर पत्रकारांची एक टीम ऑन दी स्पॉट रेती तस्करी पाहण्यासाठी गेले असता रेती तस्करांचे लोकेशन वर असलेल्या खबऱ्यांनी पत्रकार आले आहेत याची माहिती लगेच रेती तस्करांना दिली दरम्यान पत्रकार नदीवर गेल्यावर त्या ठिकाणी पलीकडच्या तीरावर तलाठी बसले होते त्यांनी लगेच पत्रकार आले आहेत तुम्ही गाड्या भरू नका अश्या सूचना तस्कराना आपल्या मोबाइल वरून दिल्या त्यामुळे रेती तस्कराची किती अलर्ट यंत्रणा आहे हे दिसून येते सर्वच यंत्रणा तस्करावर जवळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे खऱ्या अर्थने रेती तस्कराच्या मुसक्या आवळणे महसूल विभागा समोर मोठे आव्हान उभे टाकले आहे ‘