ज्ञानविकास विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन संपन्न

 

प्रतिनिधी सागर जैवाळ
सिल्लोड-

येथील ज्ञानविकास विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ पालक श्री.किसन काशीनाथ साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री.ए.डी. सोनवणे यांनी या दिनाविषयाचे महत्व पटवून देताना 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानात विस्तारलेला होता. त्यामध्ये 565 संस्थांनापैकी 562 संस्थांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु हैद्राबाद, जुनागड आणि काश्मीर या संस्थांनानी स्वतः ला स्वतंत्र घोषित केल्यावर साहजिकच भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानाच्या अधिपत्याखाली येत होता.त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते. भारताच्या पोलिसी कारवाई नंतर 17 सप्टेंबर रोजी हैद्राबाद संस्थांनचे विलीनीकरण भारतात करण्यात आले.यामध्ये महाराष्ट्रात मराठवाडा हा विभाग येतो.आणि याच मराठवाड्याला 15 ऑगस्ट ऐवजी 17 सप्टेंबर रोजी स्वतंत्र मिळाले.या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला आज 72 वर्ष पूर्ण झाली त्याचा आज 73 व वर्धापन दिन साजरा करण्यात आला.असे यावेळी श्री.सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी सद्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित अंतराचे पालन करून ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ पालक किसन काशीनाथ साळवे,बालाजी सखाराम साळवे, मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Comment