सचिन पगारे नाशिक
जातेगाव येथील जेहूर पांधी रस्त्याच्या दुरुस्ती बाबत सदर शेतकर्याच्या उपस्थितीत प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगांव येथील जेहूर पांधीच्या कच्च्या रस्त्यामूळे शेतकरी, वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत .हा रस्ता शेतकरी, मजूर, विद्यार्थी, रुग्ण, आदींसाठी जीवघेणा ठरत आहे.या रस्त्याचे काम मार्गी लागल्यास नागरिकांचे जीवन गतिमान होईल. अशी मागणी या भागातील नागरिकांची असून सदर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका प्रहार संघटने मार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .सदर निवेदनात म्हटले आहे की, जातेगाव येथील जेऊर पांधी रस्ता चार कि.मी. असून त्या रस्त्याचा क्रमांक १५३ आहे. त्या रस्त्यालगतच गावातील १५० लोकवस्ती असून आज रोजी सदर शेतकऱ्यांचा गावा सोबत संपर्क तुटला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक, फळबाग याची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सदर रस्त्याची पाहणी करून तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी या रस्त्याची कामे करून घेण्यात यावे . संबंधीत अधिकाऱ्यांमार्फत रस्त्याची तात्काळ पाहणी करून सदर रस्त्याची दुरुस्ती करावी तसे न झाल्यास शेतकऱ्यां समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यापासून होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील .असा इशारा देण्यात आला .सदर निवेदन नांदगाव तालूका प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी नांदगाव तहसीलदारांना सादर केले. जनार्दन भागवत, निवृत्ती सोनवणे, सोमनाथ पवार ,चंद्रभान झोडगे, , रविकांत भागवत, राहुल पवार, गणेश सोनवणे ,सोनू पवार, नवनाथ थोरात, दत्तू चव्हाण, मारुती चव्हाण, निवृत्ती चव्हाण आदी युवा शेतकरी उपस्थित होते.