गजानन सोनटक्के
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-
मा.जिल्हाधिकारी बुलडाणा श्री एस राममूर्ती यांचा तालुक्यातील खेर्डा खु सूनगाव व आसलगाव येथील कृषी विभागाच्या कामाचा पाहणी दौरा केला.खेर्डा खु येथील आत्मा नोंदणीकृत महात्मा फुले सेंद्रिय शेतमाल उत्पादक गटातील शेतकरी श्री.संतोष पुंजाजी ईटनारे यांच्या शेतातील सेंद्रिय पद्धतीने घेत असलेल्या कापूस व मिश्र पिके यांची पाहणी केली गटामार्फत तयार केल्या जाणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा उत्पादने उदा.दशपर्णी अर्क,निमार्क,पंचगव्य,रायझोबियम इत्यादी बाबत माहिती गटातील शेतकऱ्यांनी दिली मा जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची व विक्रीची माहिती जाणून घेतली.
सूनगाव येथील वनोषधी उत्पादक शेतकरी श्री सखाराम पुंजाजी मिसाळ यांच्या शेतातील सफेद मुसळी पिकाला भेट दिली.सफेद मुसळी व इतर वनौषधी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन काढणीपश्चात प्रक्रिया युनिट उभारणी बाबत मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नरेंद्र नाईक साहेब यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या वनौषधी उत्पादन व विक्रीबाबत मा.जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतले.
आसलगाव येथील श्री सतीश शंकर भुसारी यांच्या शेतातील कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या सीताफळ फळबाग,शेडनेटगृह व त्यातील भाजीपाला उत्पादनाबद्दल मा.जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी हितगुज केले. यावेळी मा.जिल्हाधिकारी यांच्या सोबत मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.दीपक पटेल,तालुका कृषी अधिकारी श्री वाकोडे, मंडळ कृषी अधिकारी श्री.निमकर्डे,नायब तहसीलदार श्री खाडे,तालुका तंत्र व्यवस्थापक श्री.राऊत, जामोद मंडळाचे मंडल अधिकारी चोपडे साहेब सूनगावचे तलाठी केदार साहेब, कृषी सहाय्यक पवन नवथळे,कृषीमित्र मोहनसिंह पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे रमेश वंडाळे मोहनसिंह राजपूत यांच्यासह कृषी विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.