युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांची जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
जाफ्राबाद- तालुक्यात चोरीच्या घटना या वाढत असल्याने शहरातील चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसून चोरी व अवैध वाळू वाहतुक थांबवण्यासाठी प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
जाफ्राबाद शहरांच्या हद्दीतील प्रमुख चौकात प्रामुख्याने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौक,अहिल्यादेवी होळकर चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,महाराणा प्रतापसिंह चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन शेतकरी बांधवांच्या होणारे शेतमाल चोरी,तसेच तालुक्यातील पुर्णा,धामना,केळणा या नदीपात्रातील वाळुचे अवैध चोरट्या मार्गाने उत्खनन करुन वाहतूक सर्रासपणे चालु आहे. शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून महसुलाची चोरी रेती तस्कर करित आहेत.
मौजे माहोरा ग्रामपंचायत या ठिकाणीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक आहेत. कारण या ठिकाणावरून विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक नेहमी होत आहेत त्यामुळे शासनाच्या महसुलाच्या चोरी शोधणे पोलिस प्रशासनाला सोपे होईल .
मागील काही दिवसांपूर्वी व्यापारांचे गोडाऊन फोडून सोयीबीनचे पोते चोरट्यांनी लंपास केले होते. तरी सिसिटिव्हि कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक असल्याने CCTV कॅमेरे लावल्यास कारवाई करण्यास मदत होईल. असे युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांनी निवेदनात म्हटले आहे..