गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चाळीस वर्षीय विजय शंकर केदार हा तरुण इसम दिनांक 23 नोव्हेंबर सकाळी अकरा वाजेपासून घरून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी या तरुण इसमाचा मृतदेह सुनगाव जवळील शेत शिवार सुनगांव भाग दोन मधील गट नंबर पाचशे वीस दिनेश ढगे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.सदर इसमाचा मृतदेह सुनगाव येथीलच रामदास केदार यांना दिसून आल्याने त्यांनी गावचे पोलीस पाटील तळवी यांना माहिती दिली. पोलीस पाटील तडवी यांनी सदर घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीआय घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल तैय्यब अली, पोलीस कॉन्स्टेबल इंगळे, पोलीस शिपाई वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत, सदर इसमाचा मृतदेह विहिरीतून गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढुन मृतदेहाचा पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तर प्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव जामोद येथे नेण्यात आला. सदर इसम हा विवाहित असून त्याला 9 वर्षीय मुलगा आहे . त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.