गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगांव जा.प्रतिनिधी
आज दिनांक १२/०४/२०२१ चे सकाळी अंदाजे ५.०० वा. चे सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री कटारिया यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन भिंगारा ते निमखेंडी रोडने गस्त करीत असतांना रस्याचे बाजुने दबा धरून बसले असता,वरील वेळेला भिंगाराकडून जळगांवकडे येणा-या रस्त्याने राखीव क.नं.३७१ निमखेडी बिट या ठिकाणी चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार क्रमांक MH-२०BC-३९७ ही दिसून आली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वनअधिकारी/वनकर्मचारी यांना पाहून गाडी सोडून जंगलातून पसार झाला. त्याला वनअधिका याने ओळखले असून तो इसम जामोद येथील तेजराव अशोक लोणे असून तो वरील गाडी व त्याचा मोबाईल हँडसेट घटनास्थळी सोडून फरार झालेला आहे. मोक्यावर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध वनोपज सालई गोंद ८ कट्टे दिसून आले. त्याचा पंचासमक्ष पंचनामा करुन वजन केले असता,२६५ किलो भरले. सदर मालमत्ता जप्त करुन आरोपी विरुध्द वनगुन्हा क्रमांक ६६५/१६६०१ दिनांक १२/०४/२०२१ जारी करुन जप्त वाहन,सालई गोंद मोबाईल हँडसेट जळगांव जामोद येथील लाकूड आगारात आणून ठेवण्यात आलेला आहे. फरार आरोपीचा शोध घेणेसाठी वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी जामोद परिसरात शोध घेत आहेत. आरोपीविरुध्द भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६(१) ड,फ,ग,४१(१),४२(१) (२),५२,६१ ए.६९ व महाराष्ट्र वन नियमावली नियम २०१४ चे नियम ३१,८२ नुसार गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. सदरची कारवाई मा.श्री.अक्षय गजभिये,उपवनसंरक्षक प्रादेशिक बुलडाणा मा.श्री.आर.आर.गायकवाड,सहा.वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) बुलडाणा यांचे आदेशाप्रमाणे श्री.बि.डी.कटारिया,वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद प्रादेशिक व श्री.पी.जी.सानप वनपाल हे करीत आहेत.सदर कारवाईत श्री.ए.आर.खेडकर,श्री.आर.व्ही.फड,श्री.बि.एम.खेडकर हे वनरक्षक व फायर कॅम्पवरील व निमखेडी नाक्यावरील मजुर यांनी सहकार्य केले आहे.फरार आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु आहे.