जळगांव जामोद वनपरिक्षेत्र मध्ये 40 हजार रु किमतीचा सलाई गोंद जप्त आरोपी फरार

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

दिनांक 23/03/2021 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या
गुप्त माहीतीवरुन, परिक्षेत्रातील क्षेत्रिय कर्मचारी हे करोली भिंगारा जुना रस्ता यावर दबा
धरुन बसले असता,काही लोकांचा पायी चालत येण्याचा आवाज ऐकू आला. त्यावरुन
त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी डोक्यावरील ओझे टाकून पळ
काढला.त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता,ते जंगलाचा रस्ता व अंधाराचा
फायदा घेवून पळून गेले. त्यांनी टाकलेल्या गोणीची पाहणी केली असता ,त्यामध्ये 16
गोणी अंदाजे 400 किलो वन उपज सालई गोंद असल्याचे दिसून आले व त्याची किंमत
अंदाजे रु.40,000/- एवढी आहे.त्याचा मोका पंचनामा करुन वनगुन्हा क्रमांक 721/13
दि.24/03/2021 जारी करण्यात आला
आहे. मा.श्री.अक्षय
गजभिये,उपवनसंरक्षक,बुलडाणा, मा.श्री.गायकवाड, सहा.वनसंरक्षक (प्रादेशिक व
कॅम्पा), बुलडाणा व मा.श्री.बि.डी.कटारिया, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली
आरोपींचा शोध घेण्याचे काम श्री.पी.जी.सानप, वनपाल व त्यांची चमू करीत आहे.सदरचे
वनगुन्हे कामात मा.श्री.गिरीश जतकर परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी,
श्री.एस.पी.देवकर, वनरक्षक, श्री.ए.जी.घुईकर, वनरक्षक, श्री.एन.बी.उबरहंडे, वनरक्षक,
श्री.ओ.आर.खेडकर,वनरक्षक व फायर कॅम्पवरील मजुर यांनी मौलाचे सहकार्य केले
आहे.आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
वनक्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड,अवैध गोंद वाहतुक किंवा वनाचे संबंधात इतर काही
गुन्हे निदर्शनास आल्यास त्यासंबंधी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क
साधण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment