सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट समुद्रपुर तालुक्यातील जाम बसस्थानक परिसरातील फळविक्रेत्याचे दुकानातील पेटीतील चार हजार रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास समुद्रपुर पोलिसांनी अटक केली.
आरोपीकडून चोरी केलेल्या चार हजार रक्कमेपैकी १९०० रुपये रकमसुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीची क्लोन उर्फ राहुल शांताराम तुमडाम(२४)अशी ओळख पटली असून आरोपी जाम येथील हनुमान वार्ड क्र.२ येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार सौ सुमन जयसिंग भाजीखाये वय ४५ वर्ष राहणार जाम या फळविक्री करणाऱ्या महिलेने दिनांक १६ मार्च रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे पतीचे दुकानातील पेटीतुन चार हजार चोरी गेल्याची तक्रार दिली होती, जाम बस स्टॅन्ड चे बाजूला फिर्यादि महिलेचे फळ विक्रीचे दुकान असून त्या दुकानामागे तीचे पतीचे चपलाजोडे दुरुस्तीचे दुकान आहे.
दिनांक १६ मार्च रोजी पहाटे फळ वितरकांचे पैसे देणे असल्याने चार हजार रुपये रोख रक्कम तिचे पतीचे दुकानाच्या पेटीमध्ये ठेवले होते दिनांक १६ मार्चचे मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकान फोडून चार हजार रुपये रोख रक्कम चोरी केले .
आरोपी विरुद्ध अ. क्रमांक १०२/२०२१ कलम ४५७ ,३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार निलेश पेटकर व पथक करीत असतांना जाम येथील क्लोन उर्फ राहुल शांताराम तुमडाम (२४) यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने अटक करण्यात आली चोरलेल्या चार हजार रुपये पैकी एकवीसशे रुपये आरोपीने खर्च केल्याने उर्वरित १९०० रुपये रोख रक्कम व फिर्यादी चे आधार कार्डची झेरॉक्स कागद आरोपींकडून जप्त करून गुन्हा उघडडीस आणला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम , पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन समुद्रपूर येथील पोलीस अमलदार नीलेश पेटकर ,विक्की मस्के मनोज कोसुरकर ,समीर कुरेशी यांनी केली आहे .
पोलिसांची गस्त
जाम परिसर तसेच समुद्रपूर परिसरात रात्री वेळी पोलीस गस्त वाढविण्यात आलेली असून नागरिकांना दुकानांमध्ये रोख रक्कम किंवा मूल्यवान वस्तू ठेवू नये तसेच सुरक्षितते करिता कॅमेरे लावण्याचा सूचना देण्यात आले आहेत