चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांनवर होणार कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे ; 25 मार्च पर्यंत चाचणी करण्याचे आवाहन ; विशेष चाचणी कॅम्प चे आयोजन

 

हंसराज उके अमरावती

चांदुर रेल्वे तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता तालुक्यातील प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आले आहे, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांनी कोविड चाचणी सक्तीची केली असून 25 मार्च पर्यंत चाचणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आज झालेल्या एका बैठकीत उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी या सूचना दिल्या आहे, चाचणी सुलभ व्हावी यासाठी स्थानिक सरस्वती शाळा येथे 23 मार्च आणि न प कन्या शाळा येथे 24 मार्च रोजी दुपारी 1 ते 4 पर्यंत व्यावसायिकांसाठी विशेष कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही तहसीलदार यांनी सांगितले, यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री आर कोवे, महिला बाल विकास अधिकारी वैशाली ढगे, न प चे प्रशासन अधिकारी, गट शिक्षणअधिकारी मुरलीधर राजनेकर उपस्थित होते. तालुक्यात काल दि 21 मार्च रोजी 20 कोरोना रुग्णाची नोंद झाली, त्यामुळे तालुक्यासोबत शहरातील कोरोना चाचणी वाढविण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे, या शिबिरात इतर कोणालाही चाचणी करून घेता येईल या दोन सेंटर सह ग्रामिण रुग्णालयात रोज सकाळी 9 ते 12 या वेळात चाचणी सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी कोवे यांनी सांगितले. तर 25 मार्च पर्यंत तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी कोविड टेस्ट करून त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले त्यानंतर सर्व दुकानांना भेट देऊन चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात येणार असून प्रमाण पत्र नसणाऱ्या दुकानावर नाईलाजाने दंडात्मक कारवाई करावी लागणार असल्याचेही तहसीलदार इंगळे यांनी सांगितले.

Leave a Comment