अकोट अकोला मार्गावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरील पुलाला, पडलेल्या भेगा मुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे अकोट व तेल्हारा तालुक्याचा तसेच मध्यप्रदेशातील संपर्क अकोला जिल्ह्यशी पुर्णपणे तुटलेला होता.
त्यामुळे अकोट तालुक्यातील जनतेमध्ये शासना विषयी प्रचंड चिड निर्माण झाली होती. शेतकरी, विद्यार्थी, सरकारी नोकर, व्यावसायिक, आणि पेशंटची, खुप गैर सोय होत होती.
पेंशटची गैर सोयी दोन जनांना जिव गमवावा लागला होता.
त्यासाठी अकोट तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी सर्व पक्षीय संघर्ष समितीची स्थापना करून त्यांनी दि 15/11/2022 धरणे आंदोलनाला सुरुवात केली व आठ दिवस आंदोलन सुरू ठेवले
या आंदोलनाला परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील अनेक आमदार, लोकप्रतिनिधी, व नेते मंडळींनी उपस्थिती दर्शविली.
या आंदोलनाची दखल खुद केंद्रिय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेबांनी घेतली व पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. या आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते मनोहररावजी शेळके, कांग्रेस पक्षाचे चे पुरुषोत्तमजी दातकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुभाऊ मंगळे, शिवसेनेचे नितीनभाऊ ताथोड संरपच निंभोरा, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुरेंद्रभाऊ ओंईबे, गांधीग्रामचे संरपच ठाकरे, शिवसेनेचे दिलीप लेलेकर, श्रीकृष्ण गावंडे, अनिल ओहे, राजुभाऊ एखे, मुश्ताक शाहा, मधुकरराव पाटकर, संतोष शिवरकार, भिमराव पळसपगार,प्रकाश गवई, भिमराव तायडे,सुनील अघडते, कालेखा पठाण, मारोती सपकाळ, सुभाष फुरसुले,शंकरराव कुटे, संजय मांजरे, आंनदभाऊ अढाऊ, अभि खडे, कैलास संदानशिव, गणेशराव खोडके,मंगेशभाऊ ताडे, सुदर्शन किरडे, दिलिप अवधूत, बाळासाहेब इंगळे, विलास वसु,अय्याज अली रेल, सलिम भाई रेल, विलास जाधव,शरदभाऊ वाघोलीकर, सुनीलभाऊ बांगर, विनोद वसु पाटील, हर्षल कोल्हे, उमेश खंडारे, गणेश बुटे, पुर्णा खोडके,
या सर्वांचे आंदोलनाला सहकार्य लाभले.
या आंदोलनाला सगळ्यात जास्त महेनत वंचित बहुजन आघाडीचे नेते मनोहररावजी शेळके साहेब यांनी घेतली. त्यांचे वडील आजारी असतानाही त्यांनी आंदोलन बंद पडु दिले नाही. हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या आंदोलनामुळेच पुलाचे काम लवकर सुरू करण्यात आल्याचे जनतेमध्ये चर्चा असुन परिसरातील सर्व नागरिक आंनद व्यक्त करत आहेत.