कोरोना लॉकडाऊन काळात,विद्युत ग्राहकाची फसवणूक केल्याबाबद ऊर्जा मंत्री श्री,नितीन राऊत व विद्युत कंपन्यांचे संचालक यांच्या वर विद्युत ग्राहक जनतेची फसवणूक केल्या बद्दल – फ़ोजदारी गुन्हा दाखल करा

 

 

अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे,

त्या अनुसंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हयाच्या वतीने कोरोना काळात तीन महिन्याच्या लॉक डाऊन काळातील राज्यातील विद्युत ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिल पाठविण्यात आले, वीज ग्राहकांना वीज बिला मध्ये दिलासा देण्याचा खोटा आश्वासन देऊन सर्व सामान्य जनतेला महिनो महिने झुलवत ठेवणे व त्यानंतर विद्युत ग्राहकांना वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीज बिल वसूल करणे हि केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाही तर वीज कंपन्यांशी संगमत करून करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट आहे,व फसवणूक करण्यात आली या करिता मा, राज साहेबा यांच्या आदेशाचे पालन करत गोंदिया जिल्ह्या तर्फे हि ऊर्जा मंत्री श्री,नितीन राऊत याच्या सह महावितरण कम्पनी प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहोचविण्याचा फ़ोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले,या प्रसंगी गोंदिया जिल्हा अध्यक्ष मनिष चौरागडे,जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे,तिरोडा तालुका अध्यक्ष श्रीकांत ढबाले,गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,तिरोडा तालुका अध्यक्ष फटींग क्षितिज वैध, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave a Comment