इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
. शेगावकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारल्याने कांद्याच्या भावा मध्ये मोठी घसरण होऊन. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
आता कुठं शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळायला सुरवात झाली होती कांदा २५ ते ३० रूपये किलो ने बाजारात विक्री होत होता.परंतु केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांदाचे भाव १२ ते १६ रूपये किलो पर्यत घसरले आहे.
केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने अश्या प्रकारचे अन्याय कारक निर्णय घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40% वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्या हा कवडी मोल भावाने विकावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून.
केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्यांचे कांबर्डे मोडले आहे. हा अन्याय कारक निर्णय केंद्र सरकारने त्वरित माघे घेण्यात यावा करीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री साहेब यांना तहसीलदार साहेब मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
कांद्यावरील निर्यात शुल्ल हा निर्णय त्वरित माघे घेण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्क रस्त्यावर उतरणार असल्याच ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आला आहे. या वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्तित होते.