यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
, तालुक्यातील किनगाव येथे पुन्हा वाळु माफीया व महसुलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाळुची अवैद्य वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनास कर्तव्यावर असलेल्या मंडळ अधिकारी जगताप यांनी अडविल्याने मोठा वाद निर्माण झाले असुन अशा प्रकारे वाळु माफीया आणी महसुल यांच्या वाद निर्माण होण्याची ही तिसरी घटना आहे .घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्यासह पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली .दरम्यान तिनच दिवसापुर्वी किनगाव गावात मंडळ अधिकारी सचिन जगताप आणी त्यांच्या महसुल कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे गुप्त माहीतीचा आधार घेवुन अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या या वाहनावर कारवाई करण्यात आली असता , काल दिनांक ४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पुनश्च गुप्त माहितीच्या आधारावर नाकेबंदीवर असलेल्या महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी वाळुने भरलेल्या डंपर या चारचाकी वाहनास अडविण्याचा प्रयत्न केला असता , या पुर्वीचअवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर केलेल्या वादग्रस्त कारवाईमुळे गोंधळ निर्माण होवुन कर्मचाऱ्यावर जिवे ठार मारण्याचे प्रयत्न झाले होते . याच घटनेच्या पार्श्वभुमीवर महसुल प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलीसांनी तात्काळ कडक कारवाई करीत महसुल पथकास जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असुन , याच कारवाईच्या गोंधळामुळे महसुल आणी वाळु माफीयाचा संघर्ष वाढला असुन , कदाचित याच झालेल्या कारवाई संतापाच्या भरात महसुल प्रशासन आणी वाळु माफीया यांच्यात संघर्ष निर्माण झाले असुन , आज दिनांक ४ मार्च रोजी रात्री ९, ३० वाजेपासुन किनगावच्या बस स्टॅन्ड जवळच्या चौफुली पाँईटवर सुमारे चार पाचशे लोकांच्या उपस्थितीत वाळु माफीया व महसुल प्रशासनाच्या मध्ये डंपर अडविल्याच्या कारणावरूण मोठा दांगडो निर्माण झाले याच प्रसंगातुन जळगावच्या दिशेने पळुन जाण्याच्या गोंधळात या डंपर खाली रस्त्याने जाणाऱ्या काही महीला या थोडक्यात बचावल्या या संदर्भात यावलचे तहसीलदार महेश पवार , किनगावचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह तलाठी व महसुल कर्मचारी हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असुन ,यातील डंपरचा क्लीनर अमोल सपकाळे यास डंपर चालक सोडुन पसार झाला , पोलीसांकडुन क्लीनर सपकाळे यास रात्रीच अटक करण्यात आली असून , डंपर चालक हा वाहन घेवुन घटनास्थळावरून फरार झाला असुन रात्री उशीरापर्यंत पोलीसात मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक व मालक यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .