किनगाव चुंचाळे रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तिचा र्निघुण खून परिसरात एकच खळबळ पोलीस घटनास्थळी दाखल

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील एका वयोवृद्ध व्यक्तिचा अज्ञात व्यक्तिने धारधार हत्याराने र्निघुणखुन केल्याची घटनासमोर आली आहे .

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की ,भिमराव शंकर सोनवणे वय ६० वर्ष वाहनचालक राहणार किनगाव बु॥ तालुका यावल यांचा रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरडुन नंतर दगडाने ठेचुन खुन केल्याची घटनासमोर आली आहे .

चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली धारधार हत्याराने गळा कापुन दगडाने ठेचुन अत्यंत र्निघुण खुन झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली असुन या घटनेमुळे किनगाव व चुंचाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ,

घटनेचे वृत्त कळताच फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर , पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पयक घटनास्थळी पहोचले असुन, घटनास्थळी स्वानपथकास बोलविण्यावा आले आहे .

मागील चार ते पाच महीन्याच्या कालावधीत अशा प्रकारे खून झाल्याची तालुक्यातील ही चौथी घटना आहे.

या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात खुन झालेल्या व्यक्तिचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा करण्यात येत आहे. हा खून कुणी व कशासाठी झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment