नागरीकांनी दिला जिल्हाधिकारीना निवेदनातुन आमरन उपोषणाचा इशारा
सिंदी रेल्वे ता.१२ : नेहमीप्रमाणे स्थानिक नगर पालिका प्रशासणाला अतिक्रमणाबाबत अनेक लेखी तक्रारारी करुन सुध्दा कारवाई शुन्य नगर पालीका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश पेटला असुन प्रभाक क्रमांक ७ मधील वार्ड क्रमांक १३ येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन शुक्रवारी (ता.१६) पासुन नगर पालिका कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचाच इशारा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की,घरटॅक्स सक्तीने वसुल करणार्या नगरपालीका प्रशासणाने नुकतीच अव्वाच्यासव्वा घरटॅक्स वाढीची नोटीस सर्व सिंदीवासीयांना बजावली मात्र कोणत्याही टॅक्सधारक नागरीकानी अतिक्रमणाबाबत किवा दोन शेजारी घरामधील जागेवरुन उध्दभवलेल्या वादावर कवडीची कारवाई सिंदी नगरपालिका प्रशासन करीत नाही परिणामता शहर अतिक्रमणाने बजबज झाले आहे गल्लीबोळातुन दुचाकी जाने कठीन झाले आहे. याबाबत संपुुर्ण सिंदीवासीयांत पालिका प्रशासना विरुद्ध रोष पहायला मिळतो.
शहरातील प्रभाक क्रमांक ७ वार्ड क्रमांक १३ मधील रहिवासी प्रभाकर लारोकार यांच्या नविन घराचे बांधकाम सुरू आहे त्यांनी आपल्या घराचा जीना/ पायर्या सार्वजनिक आमरस्त्यावर बांधल्यांने परिसरातील नागरिकांना जाने-येने करतांना अडचन होते. या अतिक्रमणाबाबत नगर पालिका प्रशासणाला मोहल्ल्यातील नागरीकानी तीनदा लेखी तक्रार केली. पालिका प्रशासनाने दोनदा प्रत्यक्षात मोक्का पाहनी केली आणि श्री लारोकार यांनी अतिक्रमण केल्याचे मान्य केले मात्र कारवाई शुन्य नगरपालिकेने अद्याप हे अतिक्रमण पाडुन मोकळे केले नाही.
पालिका प्रशासन केवळ अतिक्रमणाच्याच मुद्दावर कोणाच्या दबावात काम करते हेच कळत नाही.
शेवटी वैतागुन परिसरातील रहीवाश्यांनी खुशाल उर्फ पिन्टु इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना हि समस्या बुधवारी (ता.१५) पर्यंत निकाली काढली तर ठिक अन्यथा शुक्रवारी (ता.१६) पासुन नगर पालिका कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचाच इशारा दिला आहे.
कारवाई शुन्य नगर पालीका प्रशासनाच्या विरोधात अनियमित होणार्या पाणी पुरवठा बाबत काॅग्रेसने नुकताच जनआक्रोश मोर्चा काढुन रोष व्यक्त केल्याच्या बातमीची शाई वाळते न वाळते तर वार्ड क्रमांक १३ मधील नागरीकांनी अतिक्रमणाच्या समस्येवर आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने पालिका प्रशासना विरुद्ध आक्रोश पाहाला मििळतो आहे