कामचुकार ग्रामसेवक सुदाम शिंदे याच्यावर तात्काळ कारवाई करा

 

आवार गावातील नागरिकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

आवार येथील ग्रामसेवक सुदाम शिंदे हे नेहमीच ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर राहत असून ते आपल्या मुख्यालय राहीत राहत नाहीत त्यामुळे नागरिकांना महत्त्वाच्या दाखल्यांसाठी नाहक त्रास सहन करा लागत आहे त्यामुळे या कामचुकार ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आवार येथील नागरिकांनी 12 ऑक्टोंबर रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सचिव सुदाम शिंदे हे त्यांच्या कर्तव्यात कसूर करत असून गत एक वर्षापासून शिंदे यांनी ग्रामपंचायतीची ग्रामपंचायत मध्ये आमसभा घेतलेली नाही तसेच ग्रामपंचायतचे कोणते विकास कामे चालू आहेत किंवा चालू होतील याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आवारगावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरहू नुकसानीचे सर्वेक्षण ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे सोपविण्यात आले होते परंतु सदर सर्वे हा ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता तसेच गावामध्ये मुनादी न देता कोणाच्या तरी घरी बसून कागदोपत्री हा सर्वे केल्याचे दिसून येत आहे कारण सर्वेक्षणात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या नावाची निघालेली यादी यामध्ये कोणतेही साम्य आढळून येत नाही तसेच ग्रामसेवक आणि शेताचे सर्वेक्षण करतेवेळी शेतकऱ्यांच्या कोणत्याही सर्वेक्षणाच्या अहवालावर स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही त्यामुळे सदरहू अतिवृष्टीचा शेत सर्वेक्षण हे शेताच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ न करता अंदाजे करण्यात आलेला आहे किंवा तोंड पाहून केलेला आहे त्यामुळे संबंधित सचिव शिंदे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास 16 ऑक्टोबर पासून ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर शेख इरफान शेख मन्नान, मुकीन बेग मशीन बेग, शेख अनिस शेख तसलीम, दिनेश बोदळे, चेतन इंगळे , प्रकाश अवचार , रमेश वानखडे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत

Leave a Comment