उद्धवसाहेब या संजय राऊतांना आवरा
चिखली – दि.२८ जून रोजी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर वाचाळविर संजय राऊत यांचा जाहीर निषेध केला आहे.
संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातुन शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्या बद्दल रयत क्रांती पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे, गेल्या काही दिवसांपासून वाचाळविर संजय राऊत हे मनात येईल ती बडबड करत असतात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत पवारांच्या आशीर्वादाने राऊतांच्या तोंडाने शिवसेना सँम्पवण्याचा डाव सुरू असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी म्हटले असून राऊतांना कंटाळून शिवसेनेचे पन्नासच्या वर बाळासाहेबांचे ओरिजन शिवसैनिक आमदार महाराष्ट्राचे खरे वाघ संघटना सोडण्याच्या तयारीत असून,आजवरच्या राजकारणातील सर्वात खालची पातळी गाठल्या जात असल्याचे संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून वारंवार दिसत असते,सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी कंगना राणावत असेल ,किरीट सोमय्या असतील त्यांनतर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे व रौउतांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गोवाहटी येथे गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्याने त्यांना देखील केंद्रा कडून वाय व झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार असल्याने हे महाशय प्रसारमाध्यमांद्वारे वाट्टेल ते बरळत असून त्यांनी त्यांच्याच आमदारांसह शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना देखील तमाशातील नाचे असे सँम्बोधून महाराष्ट्रातील लोककलेचा देखील अपमान त्यांनी केलेला आहे म्हणून आदरणीय उद्धव साहेब या राऊतांना आवरा अन्यथा महाराष्ट्रभर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रयत क्रांती पक्षाचे प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी दिला आहे,