सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
काल दिनांक 30 नोव्हेंबर रोजी मा जिल्हा वाशिम ‘मालेगाव तालुक्यातील हनवतखेडा या गावांमध्ये चिरंजीव हर्षवर्धन व चि . रूपाली या नव दाम्पत्याचा विवाह सोहळा पार पडला !या विवाह सोहळ्याचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे !मंगरूळपीर . – वाशिम मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लखनजी मलिक होय !एखादा आमदार फक्त पुढाऱ्यांच्या मुलींच्या – मुलांच्या लग्नांमध्ये आवर्जून हजेरी लावत असतो !मोजकेच आमदार याला अपवाद आहेत की जे गोरगरिबांच्या मुलांच्या \मुलींच्या लग्नाला आवर्जून पूर्णवेळ उपस्थित असतात !पंक्तीमध्ये लोकांच्या बरोबर जेवण करतात !असेच आमदार लखनजी मलिक आहेत ते कुठल्याही गोरगरिबांच्या लग्नामध्ये फोन आल्याबरोबर किंवा कळल्याबरोबर लग्नाला आवर्जून उपस्थित असतात लोकांमध्ये बसतात !एखादा व्यक्ती आमदार झाल्यानंतर तोर्यात मिरवत असतो परंतु लखन जी मलिक यांची अतिशय साधी राहणीमान आहे -कुठलाही बडेजाव नाही !सामान्य लोकांप्रमाणे ते लोंकांत मिसळतातम्हणूनच लखनजी मालिक हे गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार आहेत ‘इतरही आमदारांना लखनजी मलिक यांचा आदर्श घेण्यासारखा आहे !