आपली मायी आणि मातीचा प्रत्येकाला सार्थ अभिमान असावाच….! आमदार समीर कुणावार

 

“माझी माती माझा देश” अभियानात हजारोनी घेतली पंचप्रण शपथ

सिंदी रेल्वे ता.१३ : प्रत्येकाला आपल्या मायी म्हणजे जन्मदाती आई आणि जगवणारी मातीचा सार्थ अभिमान असायलाच हवा…! असे गौरवोद्गार आमदार समीर कुणावार यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

स्थानिक नगर पालिका प्रशासणाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा’ समारोप कार्यक्रम म्हणून केद्र सरकारच्या “मेरी माटी मेरा देश” अभियानांतर्गत शनिवारी (ता.१२)ला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार मधुकर ठाकरे हे होते. आमदार समीर कुणावार आणि मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा
यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थित होती.

कार्यक्रमाची सुरुवात नगर परिषद सभागृहात दिप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते देश स्वातंत्र्य व सुरक्षेसाठी हुतात्मा झालेल्या थोर व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ “शिलाफलकाचे” अनावरण करण्यात आले तसेच वसुधा वंदन करून 75 वृक्ष लावून “अमृत वाटिका” तयार करण्यात आली.

शिक्षक, विद्यार्थी, तसेच माजी नगर सेवक, माजी नगर सेविका, पत्रकार, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व पालिकेचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहिदांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले व शिक्षक खोडे यांनी वाचन केलेल्या पंचप्रण शपथ सर्वानी हातात दिप प्रज्वलीत करुन घेतली.

तसेच प्रसंगी शहरातील स्वातंत्र्य सैनिक विश्वासराव रामराव देशमुख, श्रीमती. सखूबाई राचेलवार, रमेशचंद्र बळीरामजी देवतळे आणि माजी सैनिक रामदास भगवान बारई, मधुकर साखरकर, अजाब महादेव साबळे,कृष्णा गणपती पेटकर, गोपाल बोरघरे व कवडुजी धोंडीबा नरड आदींचा आदरभाव म्हणून त्यांच्या कृटुबांतील सदस्यांचा नगर परिषद सिंदीच्या वतीने मान्यवराच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विजय आश्रमा यांनी केले. तर संचालन शिक्षक भगवंत पवार यांनी केले. पंचप्रण शपथेचे वाचन शिक्षक खोडे आणि उपस्थिताचे आभार प्रशासकीय अधिकारी नंदकिशोर चव्हाण यांनी मानले.

कार्यक्रमाला शहरातील माजी नगरसेवक, प्रतिष्टीत नागरीक, सर्व बचत गटांच्या महीला, पालिकेचे सर्व कर्मचारी, शिक्षक शिक्षिकां शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यी आदीची उपस्थिती होती.

 

Leave a Comment