आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु तर्फे शाळा आपल्या दारी

 

अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु येथे डॉ.जगन्नाथजी ढोणे माजी आमदार यांनी आदिवासी विद्यार्थ्याकरिता इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षकाची सोय उपलब्ध करून दिली आहे . परंतु कोरोना काळात शिक्षण संस्था बंद असल्याने खाजगी शाळांनी शिक्षण सुरू केले आहे . परंतु आदिवासी पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांच्या पाल्यांना अडचणी निर्माण होत आहेत . ही बाब लक्षात घेउन संस्था अध्यक्ष डॉ.जगन्नाथजी ढोणे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे तसेच प्राचार्य संजय निमकर्डे . प्राथ . मुख्याध्यापक श्री.जी.डब्ल्यु.अपाले हयांच्या प्रेरणेतुन ” शाळा आपल्या दारी ” हा उपक्रम सुरू केला आहे.हया शाळेत शिक्षण घेत असलेल्या विविध गावातील विद्यार्थ्याच्या दारी जाउन शिक्षक या उपक्रमाअतर्गत शिक्षणाचे धडे घेत आहेत . दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क सुविधा नसणा – या गावामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने पालकामध्ये विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे . अनु.आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु . येथील विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन घेण्याची सोय नाही . त्यामुळे ते ऑनलाईन शिक्षण घेउ शकत नाही . त्यावर पर्याय म्हणुन शाळा प्रशासणाने शाळा आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला.शाळा बंद कालावधीत आदिवासी विद्यार्थ्याच्या घरापर्यंत शिक्षण या माध्यमातुन अनु . आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु . ता . तेल्हारा जि.अकोला येथील शाळेतील शिक्षकांनी मुलांचे गावे दत्तक घेउन त्या गावात जाउन ऑफलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे . या उपक्रमामध्ये कार्य करित असतांना शिक्षक विद्यार्थी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करित आहेत . शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षक आरोग्य शिक्षणाचे धडे सुदधा देत आहेत . सोशल डिस्टंसिंग ठेवणे मास्क चा वापर करणे , हॅडवॉश तसेच साबनाचा वापर करणे इ.गोष्टी समजावून सांगीतल्या जात आहेत . अशा प्रकारे आश्रम शाळा अडगांव बु . च्या वतील प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे साहेब एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या मार्गदर्शना नुसार शैक्षणिक कामकाज सुरू आहे .

Leave a Comment