जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर
बोदवड येथे सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेली ॲपे रिक्षा चोरट्याने शहरातील गांधी चौकातील डॉक्टर कांजळे यांच्या दवाखान्याजवळून लांबवल्याने शहरात ऐकच खळबळ उडाली या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध तक्रारदार शेख जाकीर शेख मसुद (जुना गाव परिसर सागवन जिल्हा बुलढाणा) यांनी गांधी चौकात ॲपेरिक्षा ( एम एच 28 टी .1977) ही बुधवारी 21 रोजी गांधी चौकात उभी केली होती या वाहनात २० हजार रुपये किमतीच्या 17 सफरचंदाच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र चोरट्याने बुधवारी चार ते साडेपाच दरम्यान ॲपेरीक्षा लांबवली या प्रकरणी तपास पो नाईक शशिकांत शिंदे करीत आहे