बांधवांनो बहीण तुमची असो की आमची असो.. अत्याचार करू नका
हम न होते तो तुम न होते,
न होता ये नजारा
दलित महिला मनीषा वाल्मिकी हिच्यावर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करून त्वरित कठोर शासन करण्यात यावे..फ़ानी देण्यास यावी.
उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात मनीषा वाल्मिकी नावाच्या दलित परिवारातील मुलीवर उच्च जातीतील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार करून.तिची हाडे तोडली, जीभ कापली,व गळा दाबून जीवे मारण्याचे कृत्य केले आहे.. आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करीत आहोत. तिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्व काही कथन केले.त्यानंतर पोलिसांनी त्वरीत आरोपींना अटक केली.दलित परिवारातील कुमारी मनीषा वाल्मिकी फक्त १९ वर्षे वयाची होती.ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असतांना, तिच्या पाळतीवर असलेल्या उच्च जातीतील या गुंडांनी कायद्याची भीती न बाळगता हे दुष्कृत्य केलेले आहे.
सदर गुन्हा योग्य त्या कायद्याच्या कलमाखाली फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून , आरोपींना त्वरीत कठोर शिक्षा करण्यात यावी..व फाशी देण्यात यावी.
उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात झालेल्या सामुहिक बलात्कार घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे..
ऊर्मिलाताई ठाकरे
राष्ट्रीय सल्लागार,महिला आघाडी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ