अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई द्या‌‌.महसूल विभागात स्वाभिमानीचा अधिकाऱ्यांना घेराव.

 

जळगाव जामोद/ पल्लवी कोकाटे

सततच्या पावसामुळे शेतातील उभे पिक पाण्याखाली गेल्याने सडलेल्या पिकांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या. या मागणीसाठी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी दि.२४ जुलै रोजी शेतकऱ्यांनसह थेट तहसिल कार्यालय गाठत महसुलचे अधिकारी उखे यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. यावर्षी राज्यात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतांश शेतात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे शेतातील उभे पिके पाण्याखाली गेल्याने सडुन पुर्णपणे नष्ट झाले आहेत,त्यातील कपाशी, सोयाबीन, मुंग, उळीड, मका, ज्वारी, तुर, इत्यादी पिके खराब झाली आहेत. त्यातच वाणी कीडे मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणिचा सामना करावा लागला, त्यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे, आणि आता राज्यभर सुरू असलेल्या या सततच्या पावसामुळे शेतकरी पुर्ण पणे हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांवर आलेल्या या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी, जळगाव तालुक्यातील शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाभर तिव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला.यावेळी रोशन देशमुख, सुपेश वाघ,नयन इंगळे, आशिष सावळे,नाना पाटील, अनंता गायकी, देविदास पान्हेरकर, विनोद पान्हेरकर, विनोद करागळे, यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment