Zapuk Zupuk trailer:मुंबईत 14 एप्रिल रोजी लाँच केलेल्या “झापुक झुपूक” चित्रपटाचा ट्रेलर पूर्ण महाराष्ट्रात गाजतो आहे. रितेश देशमुख यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आल्याने या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
सूरज चव्हाण यांच्या अॅक्शन अवताराची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. प्रेम, अॅक्शन आणि ड्रामाच्या मिश्रणाने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.
Policenews / प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणा-यांवर धडक कार्यवाही
25 एप्रिल रोजी प्रदर्शन होणाऱ्या “झापुक झुपूक” चित्रपटाचा ट्रेलर सध्या चांगलाच गाजत आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर आणि मिलिंद गवळी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.
Zapuk Zupuk trailer :जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांच्या सहकार्याने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये सूरजच्या लव्हस्टोरी, अॅक्शन आणि ड्रामाची उत्सुकता निर्माण होते.