Yavalnews / परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कोरपावली येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटप…

0
0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Yavalnews:तालुक्यातील कोरपावली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे अवचित्य साधून कोरपावली सरपंच विलास नारायण अडकमोल व गोविंद बहुउद्देशीय संस्था, कोरपावली चे अध्यक्ष श्री. नारायण हिरामण अडकमोल यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना स्पर्धा परीक्षा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी पुस्तके वाटप करण्यात आली.

सर्वात आधी पुलवामा मध्ये शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

यावेळी खानदेश आयकॉन पुरस्कृत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश भाऊ फेगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष देविदास तायडे, उपाध्यक्ष दीपक अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य आरिफ तडवी, जुम्मा तडवी सत्तार तडवी ,अमोल नेहेते ,अफरोज पटेल ,दीपक नेहेते, भीमराव इंधाटे ,

बादल अडकमोल, मनोज अडकमोल, समाधान अडकमोल, विनोद अडकमोल, प्रवीण अडकमोल, भरत चौधरी, दीपक तायडे, सागर तायडे, सचिन भालेराव आदी समाज बांधव तसेच सर्व महिलावर्ग सहभागी होता.

Yavalnews:तरी त्यांच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाटप च्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here