यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
Yavalnews:तहसील कार्यालयात दलालांच्या आर्थिक गोंधळामुळे सर्वसामान्याना मोफत मिळणारे रेशनकार्ड मिळवण्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतले जात असून, स्वस्त धान्य दूकानदार हे वितरणासाठी मिळालेल्या धान्यातुन अर्धापेक्षा अधिक धान्य साठवन करून काळया बाजारात विकत असल्याबाबतच्या तक्रारी असल्याची माहिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी यावल येथे सेवा हक्क दिना निमित्ताने संपन्न झालेल्या आढावा बैठकीत दिली .
यावल पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिना निमित्त आयोजित विविध शासकीय विभागाच्या कार्याचा आढावा घेण्यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानाहून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे बोलत होते . यावेळी यावल तहसीलच्या पुरवठा विभागाच्या कार्यपध्दती बाबत स्वस्त धान्य लाभार्थ्याच्या अनेक तक्रारी असल्याची माहीती खुद्द आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली .
Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन
दरम्यान अनेक श्रीमंतांकडे गरीबांच्या हक्काचे पिवळे कार्ड असुन ते तात्काळ चौकशी करून रद्द करण्यात यावेत तसेच तहसील कार्यालयात शिधापत्रिका मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन दोन हजार रूपयांची होणारी दलालांच्या माध्यमातुन होणारी आर्थिक लुट त्वरीत थांबवावी व स्वस्त धान्य दुकानदाराकडून काळया बाजारात विक्री जाणाऱ्या धान्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे यावल येथे नुकतेच रूजु झालेले तालुका पुरवठा अधिकारी अभिमन्यु चराटे यांना आदेश दिले आहे .
Yavalnews:या आढावा बैठकीस तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .सौ.मंजुश्री गायकवाड ( बोरसे ), आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आठवडे ,यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते .