प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या उपसचिवपदी राजेश तायडे यांची निवड .(Yavalnews )

 

विकी वानखेडे यावल

Yavalnews:भुसावळ येथील राजेश पंडितराव तायडे (पत्रकार )यांची प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगाव अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर चालविणाऱ्या संस्थेच्या खान्देश प्रांत उपसचिव व प्रसिद्धी प्रमुख म्हणून संस्थापक अध्यक्ष प्राचार्य आनंदराज वानखेडे यांच्या आदेशानुसार राज्याचे अध्यक्ष संजय भालेराव यांनी नियुक्ती केलेली आहे .

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन वझर आघव ते सावरगाव तेली शेत रस्त्याची शेतकर्यांची मागणी ( formernews )

सदर संस्थेच्या माध्यमातून धम्म बंधन मंगल परिणय लावून देणे, वधू वरांचा परिचय मेळावा घेऊन विनामूल्य मार्गदर्शन करणे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तथा परितक्ता महिलांना मार्गदर्शन करून न्याय मिळवून देणे

, तसेच धम्म बंधन दिनदर्शिका काढून संस्थेचा प्रचार व प्रसार करून संस्थेमध्ये निस्वार्थपणे सेवा करणे हेच उद्दिष्ट असून , बौद्ध तरुण- तरुणींना न्याय मिळवून देणे ,हेच ह्या संस्थेचे कार्य आहे. त्याच उद्दिष्टाने संस्थेने राजेश तायडे यांची खान्देश प्रांत उपसचिव तथा प्रसिद्ध प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी मोहन सरदार , विस्तार अधिकारी आर एस सपकाळे , डॉ.राजेश मानवतकर, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार तथा सुभेदार रामजी विद्यालयाचे चेअरमन राजेश झाल्टे, संस्थेच्या विदर्भाचे अध्यक्ष संदीप राऊत, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश मकासरे, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र शिक्षक रवींद्र अहिरे ,रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी

Yavalnews :अशोक निकम, ऑ. फॅक्टरी चे अधिकारी रवी मेढे, वर्धा यूनिवर्सिटी चे प्राध्यापक संदीप सपकाळे, ऑ. फँ. एससी / एसटी असोसिएशनचे अध्यक्ष राज निकम ,वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, भीम आर्मीचे गणेश सपकाळे, समता सैनिक दलाचे युवराज नरवाडे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सुरेश वानखेडे, आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले . ..

Leave a Comment