गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद सण शांततेत नव्हे जल्लोषात साजरा करा : अशोक नखाते.(Yavalnews)

0
1

 

यावल पंचायत समिती येथे शांतता समितीची बैठक.

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:आज यावल येथे दि.४गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण नियमांचे काटेकोर पालन करीत तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता बाळगून शांततेत नव्हे तर मोठ्या जल्लोषात साजरा करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

शनिवार दि. ७ सप्टेंबर आणि सोमवार दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी यावल शहरात अनुक्रमे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव सण हिंदू मुस्लिम बांधव साजरा करणार असल्याने उत्सव शांततेत आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी गणेश मंडळाच्या सदस्यांच्या व मुस्लिम बांधवांच्या काय काय अडचणी आणि समस्या आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी एक क्लिक करा 

या ऐकून घेण्यासाठी यावल पंचायत समिती सभागृहात आज बुधवार दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी तालुक्यातील पोलीस पाटील आणि गणेश मंडळासह राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी उपस्थित शांतता समिती सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या.

Yavalnews :गणेश विसर्जन रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार असल्याची माहिती दिली.ज्या समस्या आहेत त्या यावल नगरपरिषद, वीज वितरण कंपनी,महसूल विभाग यांच्यामार्फत सोडवून गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव सण शांततेत नव्हे तर मोठ्या जल्लोसा साजरा होईल याबाबत काही सूचना देऊन मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here