Yaval / तब्बल एक ट्रॅक्टर सह १३ मोटारसायकल हस्तगत करत १५ संशयित आरोपींना अटक सर्वत्र एकत्र खडबळ

 

विकी वानखेडे यावल

शहरातील कुंभार टेकडी वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतांना यावल पोलिसांच्या हाती वाहन चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १५ संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांनी ३७ मोटरसायकल व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली असून त्यातील एका ट्रऍक्टरसह १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.#yaval

 

या संदर्भातील माहिती अशी की, यावल शहरातील कुंभार टेकडी परिसरातुन दिनांक १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अजय मूलचंद पंडित यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते.

याबाबत येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्या संदर्भात पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे व राजेंद्र पवार करीत होते#yavalpolice

दरम्यान सदर तपास करत असतांना त्यांनी अर्जुन सुभाष कुंभार (वय १९ रा.कुंभारवाडा यावल) याच्यासह तिन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चौकशीत या तिघांनी ट्रक्टर सह दुचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून त्यात अजुन काही जण सहभागी असल्याचे सांगीतले होते.

या संदर्भात पोलिसांनी तपासात शहरातुन एकापाठोपाठ एक अशी एकुण १५ जणांची टोळीच चौकशीसाठी ताब्यात घेतली असून चौकशीत या सर्वांनी एक ट्रॅक्टरसह तालुक्यातील विविध गावातून तब्बल ३७ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे.#police

पोलिसांनी या प्रकरणात १३ मोटरसायकली विविध भागातून हस्तगत करून आणल्या आहेत. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरिक्षक मुजफ्फर खान, उपनिरीक्षक सुनील

मोरे,सहायक फौजदार विजय पाचपोळे,असलम खान, हवालदार राजेंद्र पवार,सुशील घुगे, योगेश खांडे, संदीप सूर्यवंशी, मोहन तायडे,अशोक बाविस्कर, अनिल पाटील,एजाज गवळी या पथकाने केली आहे. तर सदर ट्रॅक्टर हे डांभुर्णी शिवारात लपवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असुन रात्री उशीरा पर्यंत पोलीस ठाण्यात संशयीतांकडे तपास व अटक करण्याची प्रक्रीया सुरू होती.#crime

यावलसह परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी करणारी टोळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून या चोरट्यांनी तालुक्यासह परिसरातून वाहने चोरली असल्याची शक्यता असून आता पोलीस या दिशेने तपास करत आहेत.

Leave a Comment