यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे
शिक्षण प्रणालीतील मुलभूत सुधारणेच्या केंद्रस्थानी शिक्षक असणे आवश्यक आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्या समाजातील सर्वात आदरणीय आणि आवश्यक सदस्य म्हणून या प्रशिक्षणातून शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करण्यात मदत झाली पाहिजे. कारण ते आपल्या पुढच्या पिढीतील नागरिकांना खरोखरच आकार देतील.
शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी आणि शक्य तितक्या प्रभावीपणे त्यांचे कार्य करण्यास त्यांना मदत करणे आवश्यक आहे.
शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST
तरच ते विद्यार्थ्यांमध्ये अधिक गतीने शिकण्याची प्रेरणा निर्माण करू शकतील असे मार्गदर्शन यावल तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी सुरु असलेल्या प्रशिक्षणादरम्यान केले .
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन तालुका स्तरीय प्रशिक्षण दिनांक २६ ला शहरातील साने गुरुजी विद्यालयात सुरुवात करण्यात आली.
सदर प्रशिक्षणाचा हा तिसरा टप्पा असून तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषद या शाळांमधून २४० शिक्षक शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला आहे.
सदर प्रशिक्षण हे दि २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर असे पाच दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. यामध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना दोन वेळा चहा एकवेळ जेवण ही दिले जात आहे.
दरम्यान विविध सांघिक खेळ ही घेण्यात येत असल्याने मनोरंजन होत आहे.
या सर्व प्रशिक्षणार्थी यांना यावल तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली सुलभक म्हणून रविंद्र पाटील, योगेश इंगळे, राहुल पाटील, कुंदन वायकोळे , विजय बाउसकर , किशोर चौधरी , वसंत सोनवणे , गिरीश सपकाळे , संदीप मांडवकर हे मार्गदर्शन करीत आहे. तर प्रशिक्षणाचे सनियंत्रण किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ प्रमोद सोनार हे करीत आहे. Yaval News