रायपूर येथे पाणपोई व महीला निवारा चे उद्घाटन(Waternews)

 

जावेद शहा (बुलडाणा )

Waternews:जागतिक महिला दिनानिमित्त रायपुर बस स्टँड परिसरात पोलीस स्टेशन रायपुर यांच्या वतीने महिला व शाळेतील मुलींसाठी प्रवासी निवाऱ्याची बैठक व्यवस्था करण्यात आली.

तसेच जय राजे मित्र मंडळ रायपूर यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाणपोईचेही उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटनासाठी मा. सुधीर पाटील पोलिस उप अधीक्षक बुलढाणा, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, मा. दुर्गेश राजपूत ठाणेदार रायपूर पोलीस स्टेशन, बालाप्रसाद जैस्वाल, देविदास सिरसाट, ग्यानदेव सोनुने, रामदास डुकरे, बबन अहिर, हिम्मतराव जाधव, गजानन खिल्लारे आदी ग्रामसदस्य व जय राजे मित्र मंडळाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

जळगाव जामोदच्या कृष्णा नगरमध्ये आठ लाखांची घरफोडी – चोरटे पसार!(policenews )

सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते पूजन व नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना ठाणेदार दुर्गेश राजपूत म्हणाले की, आज रायपूर पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस चौकी तसेच महिला व शाळेतील विद्यार्थ्यीनींसाठी प्रवासी निवारा उभारण्यात आला.

शाळेत जाणाऱ्या मुली व महिलांसाठी बस स्थानक परिसरामध्ये बसण्याची व्यवस्था नव्हती, ही बाब लक्षात आल्यामुळे आपण महिला व शाळेतील मुलींसाठी प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर होतकरू जय राजे मित्र मंडळाच्या सदस्यांनी सुद्धा प्रवाशांसाठी पाणपोई स्थापून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि आज पोलीस उपाधीक्षक सुधीर पाटील साहेब यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचा उद्घाटन करण्यात आले. शाळेतील मुली व महिला यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बाजूलाच आपण पोलीस चौकीचेही आज महीला दिनी उद्घाटन केले.

Waternews :याप्रसंगी जय राजे मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर सिरसाट, उपाध्यक्ष बाळू देशमाने सचिव पंढरी भोसले तसेच मंडळाचे सल्लागार दिपक म्हस्के, पमा बांडे, शुभम इंगळे, सुदर्शन फोलाने, राहुल देशमाने, अरुण भोसले, गुलाबराव पाटील, अतुल सिरसाट आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment