अनिलसिंग चव्हाण बुलढाणा
waternews: बुलढाणा: मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यातच जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली असून एक लाखावर ग्रामस्थांना याची झळ पोहोचत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा माहौल असल्याने पाणी टंचाईची समस्या आणि ग्रामस्थांचे होणारे बेहाल याकडे लक्ष द्यायला नेतेमंडळींना सवड नाही. मार्चच्या पूर्वार्धातच टँकरची संख्या दुहेरी झाली आहे.
सध्या ४ तालुक्यातील १३ गावांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठयावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी, पिंपळगाव चिलमखा, सुरा,चिखली मधील हातनी, कोलारा, सातगाव भुसारी, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड, बुलढाणा मधील वरवंड, पिंपरखेड,
लग्नसराईचा मौसम झाला सुरू, चला करू या आकर्षक पारंपरिक दागिन्यांची खरेदी..( oxidejweellary )
या गावांतील एकूण ३५ ,३४६ गावकऱ्यांचे बेहाल होत आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा तोकडा पडत असल्याने गावकरी प्रामुख्याने आया बहिणींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दुसरीकडे ७ तालुक्यातील ६४ गावांची तहान अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे भागविली जात आहे. यासाठी ८१ विहिरी अधिग्रहित करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ गावांना तब्बल ३१ विहिरीद्वारे पुरवठा होत आहे.
waternews: चिखलीत १४ गावांना १९ तर मेहकर तालुक्यातील १९ गावांना १९ विहिरीद्वारे पुरवठा करण्यात येत आहे.