दुधलम येथील पाण्याच्या टाकीत दूषित पाणी / Water

 

*प्रतिनिधी*/ मूर्तिजापूर
शाम  वाळस्कर

 

दुधलम गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत २ मृत साप आढळून आल्याने गावकऱ्यात भीतीयुक्त वातावरण पसरले असून, काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

सुमारे ८ ते ९ दिवसांपासून गावातील सामान्य नागरिकांना पाण्याचा वास येत होता. गुरवारी नळ योजनेमार्फत पुन्हा पाणी सोडण्यात आले असता,पाण्याची टाकी तपासणी करण्याकरीता ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश सुभाष महल्ले,ग्रा.स. प्रभा तुकाराम दाभाडे,पंकज तुकाराम दाभाडे,रंजना पंडित,शुधोधन पंडित,रमा शंकर पंडित यांचे पती शंकर भीमराव पंडित,माजी सरपंच रवींद्र नामदेव पंडित,माजी उपसरपंच मंगेश पंडित व गावकऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या अवस्थेत दोन मृत साप आढळले.

त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुधलम ग्रामपंचायत मधील सचिव,सरपंच,उपसरपंच यांच्या या भोंगळ कारभारामुळे दूषित पाणी प्यावे लागल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा असून,संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment