अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ( viralvideo )

0
1

 

( आसीफ भोगानी कारंजा लाड )

viralvideo:कारंजा (लाड) ; सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्या प्रति रोष निर्माण करून बदनामी करण्याचे उद्देशाने अर्धवट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मो. युसुफ मो. शफी पुंजानी यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नागपूर येथे दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या विदर्भ मुस्लिम इंटेलऍक्चुअल फोरमच्या कार्यक्रम दरम्यान झालेल्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ

अनसिंग येथील रहिवासी शेख ज़मीर शेख अबरार यांनी मुस्लिम समजा मध्ये माझ्या प्रति रोष निर्माण करण्याकरिता तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने अर्धवट व्हिडिओसह लिखित संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला असून त्यामुळे माझी बदनामी झाली आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

तसेच शेख जमीर यांनी माझ्या व्यक्तिक नंबर वर देखील सदर संदेश टाकला आहे.

या आशयाच्या तक्रारीवरून शेख ज़मीर शेख अबरार रा. अनसिंग ता. जि. वाशिम यांच्यासह इतर लोकांवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ५०० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

viralvideo:असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिश्रा करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here