सय्यद वसीम खामगाव तालुका प्रतिनिधी
Viralnews :जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिक विशेष करुन तरुणांना आवाहन करण्यात येते की, व्हॉटस अॅप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मिडीयावर ठेवण्यात येत
असलेल्या आक्षेपार्ह स्टेटस, स्टोरी, रिल्स यामुळे दुस-या धर्माच्या धार्मिक भावना दुखावुन गावातील दोन समाजात सामाजीक तेढ निर्माण होत असुन त्यामुळे सामाजीक वातावरण हे दुषीत होवुन अनुचित प्रकार घडत आहेत.
Agricultural policy :/ राज्यातील शेतकऱ्यांसाठी गट शेतीचे नवे धोरण लवकरच
त्यामुळे दोन समाजात धार्मीक तेढ निर्माण होवुन शांतता भंग होईल अशा प्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह स्टेटस, स्टोरी, रिल्स ठेवु नये. तसेच आपल्या स्टेटस, स्टोरी, रिल्स मुळे कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
कोणत्याही व्यक्तीने ठेवलेल्या चुकीच्या स्टेटस, स्टोरी, रिल्स तसेच चुकीच्या पोस्ट मुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास सदर व्यक्तीवर प्रचलीत कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जलंब पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अमोल सांगळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या करीता आज दि. २३.०३.२०२५ रोजी पोलीस स्टेशन हद्दितील सर्व गावांमध्ये नागरिकांनी विशेष करुन तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करतांना तो जपुन करावा, कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस, स्टोरी ठेवणार नाही.
Viralnews:व्हिडीओ किंवा पोस्ट अपलोड करणार नाही तसेच आपल्या गावातील जातीय सलोखा कायम ठेवुन गावामध्ये शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री अमोल सांगळे ठाणेदार पोलीस स्टेशन जलंब यांच्या मार्फत करण्यात आले आहे.