viral recording :बुलढाणा:अवैध व्यवसायिकांच्या विरोधातील आंदोलन तथा पीडित महिलेला मदत केली म्हणून कुख्यात गुंड गणेश परसे यांच्याकडून आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांना जीवे मारन्याचा कट उघडकीस आला आहे.
आज 30 डिसेंबर 2023 सांयकाळी बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालया समोर कुख्यात गुंड गणेश परसे हा त्याच्या वरली मटका अवैध व्यवसाय करणाऱ्या गुंड साथीदारांसह आला असता त्या ठिकाणी त्याने अँड सतीशचंद्र रोठे यांना जिवे मारण्याचा कट रचला.
यासह अँड रोठेंना बनावट गुन्हात अडकविण्याचा संवाद आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केल्यामुळे हत्तेचा कट उघडकीस आला आहे.
हेही सविस्तर वाचा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.suryamarathinews.com/?p=24302
हत्येच्या कट कारस्थानाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित तपास यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती अँड.रोठें दिली आहे.
viral recording तीस वर्षापासून आझाद हिंद च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात जनहितार्थ आंदोलन उभारणारे अँड सतीशचंद्र रोठे यांच्यावर यापूर्वीही पाच वेळा प्राण घातक हल्ला झालेला आहे.
त्यातून ते सुदैवाने बचावले तर यावेळी हत्त्येचाकट उघडकीस झाल्याने अँड रोठेंच्या जीवीत्वास धोका असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.