चिखलीत श्वेता ताई/ राहुल बोन्द्रे ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?(vidhansabha )

 

 

चिखलीत ‘श्वेता ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार? श्वेता ताई आणि भाऊ मधील जहाल संघर्ष, टोकाचा विरोध, ‘अरे ला कारे’ चे राजकारण याचे प्रतिबिंब प्रचारातही दिसून येत आहे.

Vidhansabha :-बुलढाणा : जिल्ह्याची राजकीय राजधानी ही चिखलीची पारंपरिक ओळख. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून दोन टोकाच्या विचारधारांचे येथे अस्तित्व राहिले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे केंद्र. मात्र आता तर यामुळे १९६२ च्या निवडणुकीपासून प्रत्येक लढतीत काँग्रेस विरुद्ध (प्रारंभी) जनसंघ आणि कालांतराने भाजप असा संघर्ष पाहवयास मिळाला.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

नव्वदीच्या दशकात जिल्ह्यात दमदार आगमन करणारी शिवसेना किंवा अलीकडच्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसला येथे फारसा थारा मिळाला नाही. अजूनही हीच स्थिती आहे.

मागील काँग्रेसची दोन शकले झाल्यावरही इंदिरा काँग्रेस विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरुद्ध जनसंघ अशीच लढत झाली. या संघर्षाची टोकाची चुरस १९७८ च्या लढतीत पाहवयास मिळाली.

ती लढत जिल्ह्यातील आजवरची सर्वाधिक चुरशीची तिरंगी लढत ठरली. इंदिरा काँग्रेसकडून लढणारे जनार्दन बोन्द्रे (२७, ७८५मते), भाराकाँचे भारत बोन्द्रे (२७,६०७) आणि भाजपतर्फे लढणारे जनसंघाचे केशवराव बाहेकर ( २७४४७) यांच्यातील विक्रमी लढतीत विजयी उमेदवाराने जेमतेम १३८ मतांनी बाजी मारली. विजयी उमेदवार आणि तिसऱ्या क्रमांकारील बाहेकर यांच्यात ३३८ मतांचा फरक होता.

Vidhansabha :-काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपच्या रेखा खेडेकर यांनी १९९५ ते २००४ अशी सलग बाजी मारली. त्यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर २००९ आणि २०१४ च्या लढतीत राहुल बोन्द्रे हे आमदार झाले.

Leave a Comment