गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पाहणी करून मदत देण्याची मागणी ( vashimnews )

 

मोहम्मद बेग मिर्झा वाशिम जिल्हा प्रतिनिधी

सोमवारी मध्यरात्री मानोरा व कारंजा तालुक्याला वादळी वा-यासह पावसाने झोडपले. दरम्यान झालेल्या गारपिटीचा मानोरा व कारंजा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी व बागायतदारांना फटका बसला. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आम आदमी पार्टी ची यवतमाळ येथे 03 मार्च 2024 ला जाहीर सभा (aam aadmi party )

 

या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुसाकान भरपाई देण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हर्मेद्रा ठाकरे यांनी केली आहे २ ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्री मानोरा कारंजा व तालुक्याला वादळी वा- यासह पावसाने झोडपले.

दरम्यान आलेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील गहू, हरबरा, ज्वारी तसेच पपई, संत्रा, ऊस यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मानोरा तालुक्यातील कुपटा-इंझोरी मंडळातील चोंढी, धानोरा, चौसाळा, भोयणी, नायणी, मोहगव्हाण, पारव्हा, खापरी इत्यादी शेतशिवारात तर कारंजा तालुक्यातील सर्व कृषी मंडळात येणाऱ्या शेतशिवारातील शेतक- यांचे व बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या वर्षी शेतमालाला योग्य तो भाव मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच वारंवार अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतक-यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

vashimnews:या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हमेंद्र ठाकरे यांनी दिला आहे.

Leave a Comment