भारत माता की जय’ च्या जयघोषात रासेयो अभाविपतर्फे 75 मीटर लांब ऐतिहासिक ‘तिरंगा रॅलीचे’ आयोजन.( Vande Mataram )

 

 

‘राष्ट्रीयत्वाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे काळाची गरज’ मोहन सुरकार

Vande Mataram:सिंदी (रेल्वे): 78 व्या स्वातंत्र दिनानिमित्त स्व सौ रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे 75 मिटर लांबीच्या शौर्य व

त्यागाचे प्रतीक असलेला ऐतिहासिक तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान जय किसान’ या जयघोषांनी देशभक्तीच्या वातावरणात दुमदुमून निघाली संपूर्ण सिंदी नगरी.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या जल्लोषात या तिरंगा रॅलीत कनिष्ठ महाविद्यालयातील 200 ध्वजधारक विद्यार्थ्यांसमवेत शहरातील तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

नगर पालिकाचे कर निरीक्षकाला लाच घेतांना पकडले ( brekingnews )

तिरंगा रॅलीची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणातून प्राचार्य विलास येखंडे यांच्या मार्गदर्शनात रासेयो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर, प्रा उत्तम देवतळे व डॉ. सतीश थेरे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या सहकार्याने करण्यात आले.

रॅली इतकी मोठी होती की लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली.

रॅलीचा समारोप केसरीमल नगर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भारत माता की जय’ च्या जयघोषात रासेयो अभाविपतर्फे 75 मीटर लांब ऐतिहासिक ‘तिरंगा रॅलीचे’ आयोजन.( Vande Mataram )

Vande Mataram:याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दैनिक सकाळचे शहर प्रतिनिधी मोहन सुरकार, प्राचार्य विलास येखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर, क्रीडा शिक्षक राजु मडावी, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर व स्काऊट मास्टर गजेंद्र गिरडकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

Leave a Comment