विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा यांची मागणी..( vanchitnews )

0
4

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

vanchitnews:सांगली,दि. 30/05/2024 रोजी
वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने, मा. राज्यपाल सो, महाराष्ट्र राज्य शासन यांना मा. सांगली जिल्हाधिकारी सो यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे कळवित आहेत की,दिनांक 29 मे 2024 रोजी, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती स्तंभ महाड रायगड येथे, शालेय पाठ्य पुस्तका मध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

त्या वेळी दुपारी 12:30 वाजता त्यांनी अति उत्साही होवून आंदोलन करते वेळी डोळसपणा व तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृर्ती दहन करताना चा फोटो, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व लाव यु कॅमेरासमोर सर्व न्युज प्रतिनिधी समोर फाडण्याचे वाईट कृत्य केले आहे.

सर्व देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्याचबरोबर, शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि वैदिक श्लोकांचा समाविष्ट करून ‘आरएसएस’ चा अजंडा राबविण्याचा काम करीत, सामाजिक तेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करणारे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असताना ही हा खोडसाळ प्रकार प्रयत्न या सत्ताधारी भाजप पक्षाने सुरू केला आहे. ते ताबडतोब थांबवण्यात यावे अन्यथा, आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावे लागेल.

बातमी लाईव्ह पहा एकच क्लिक करा 

व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे ‌यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी असा कडक इशारा दिला आहे.

vanchitnews:यावेळी, वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हाध्यक्ष महाविर कांबळे, महिला आघाडी उषाताई कांबळे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक संजय भूपाल कांबळे, जिल्हा सदस्य किशोर आढाव, सांगली शहर अध्यक्ष इरफान केडिया, मिरज शहर अध्यक्ष सतिश शिकलगार, अशोक लोंढे, हिरामण भगत, रतन तोडकर, चंद्रकांत कोलप, ऋषिकेश कोलप, मानतेश कांबळे,अतिश कांबळे,वाहिद सनदी, चेतन वाघमारे, वसंत सर्जे. यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here