उमेश खारोडे यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024 पुरस्कार जाहीर ( umeshkharode )

 

umeshkharode:कलाजीवन बहुउदेशीय संस्था ,ढगा, ता. वरुड , जि अमरावती दरवर्षीच समाज विधायक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करीत असते .

या वर्षी सुद्धा कलाजीवन बहुउदेशीय संस्था, ढगा अमरावती तथा रोटरी क्लब पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कला ,शिक्षण, समाजसेवा, उद्योग , युवककल्याण ,कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024 हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे.


सदर पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थितांमध्ये कलाजीवन बहुउदेशीय संस्था अध्यक्ष डॉ युवराज ठाकरे ,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके,रोटरी क्लब पुणे अध्यक्ष सारंग बालख , अभिनेता दिग्दर्शक लेखक पियुष भोंडे असणार आहेत.या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 14 जून 2024 रोजी पुण्याई सभागृह पुणे येथे होणार आहे.

श्री खारोडे जि प म प्रा शाळा निमखेडी ता जळगाव जा जिल्हा बुलढाणा येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा देत असून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तथा संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी गावांमध्ये देणगीदार कंपनी , संस्था , व्यक्ती यांचे माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम तथा आदिवासी बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप सातत्याने करीत आहेत.

२ ट्रॅक्टर किनगाव येथे येतअसल्याची गुप्त खबर वाळूमाफियांवर धडक कारवाई,( revenuenews )

श्री सत्यसाई मेडिकेअर प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्य ,जिल्हा बुलढाणा यांचे माध्यमातून श्री खारोडे सातत्याने आदिवासी बांधवांची रुग्णसेवा करीत असल्याबद्दल या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबाबत कलाजीवन संस्थेचे अध्यक्ष डॉ ठाकरे यांनी सांगितले .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

umeshkharode:याबाबत श्री खारोडे यांनी कलाजीवन संस्थेचे आभार मानले असून सदर पुरस्काराच्या निवडीचे संपूर्ण श्रेय श्री सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्र राज्य ,जिल्हा बुलढाणा सेवा दल प्रमुख श्री कैलास कोल्हे यांना देतात

Leave a Comment