उद्धव ठाकरेंचा धक्काप्रूफ आवाज: शिवसेनेतील गळतीला सामोरे जाण्याची तयारी(Uddhavthakre)

 

Uddhavthakre:मुंबईतील राजकीय वातावरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं.

“जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोकांना आश्चर्य वाटतं, त्याचप्रमाणे माझ्या बाबतीतही असंच झालं आहे. वारंवार धक्के सहन केल्यामुळे आता मी धक्काप्रूफ झालोय,” असं त्यांनी सांगितलं. या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी स्वतःला तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

पक्षातील गळती आणि आव्हाने

शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक नेते आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच माजी आमदार राजन साळवी आणि जितेंद्र जनावळे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली.

या गळतीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी आव्हाने वाढली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शाखानिहाय कामं पूर्ण करण्याचा आणि तयारीला लागण्याचा सल्ला दिला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

उद्धव ठाकरेंचा धक्काप्रूफ आवाज: शिवसेनेतील गळतीला सामोरे जाण्याची तयारी(Uddhavthakre)
विरोधकांना इशारा

Uddhavthakre:उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला आहे की ते कितीही धक्के दिले तरी मागे हटणार नाहीत. “योग्य वेळी एक मोठा धक्का देईन, की समोरचा उठूच शकणार नाही,” असं त्यांनी सांगितलं. शिंदे गटाच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Comment