ट्रकमध्ये संसार मांडलेले दाम्पत्य: सिंदखेड राजा तालुक्यातील एकनाथ पवार यांची संघर्षमय कहाणी(Truck driver)

 

अनिलसिंग चव्हाण (संपादक )

Truck driver:सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना गावचे रहिवासी एकनाथ तुकाराम पवार आणि त्यांची पत्नी ललिता पवार यांची जीवनकथा ही एका अनोख्या संघर्षाची आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह ट्रकमधून प्रवास करीत आहे, ज्यामध्ये त्यांच्या तीन मुली देखील सोबत असतात. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची आहे की दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ललिता पवार देखील ट्रक चालविण्यात मदत करते.

एकनाथ पवार यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पत्नीचा हातभार लागावा लागतो. त्यांच्या तीन मुलींपैकी दोन, ७ वर्षाची आणि ५ वर्षाची मुलगी, ट्रकमध्ये राहतात, तर ९ वर्षाची मोठी मुलगी गावात राहते. वडधामना येथे पवार कुटुंब आपल्या मुलींना घेऊन ट्रक भरण्यासाठी आले असताना ही संघर्षमय कहाणी समोर आली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

 पुणे ते नागपूर: मालाची वाहतूक आणि संघर्ष

पवार कुटुंब पुणे ते नागपूर दरम्यान मालाची वाहतूक करते. अनेक वेळा दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय होत नसल्याचे त्यांनी सांगितले. २०२३ मध्ये त्यांनी महिंद्रा कंपनीचा कर्ज काढून ट्रक विकत घेतला, मात्र ट्रकमधील तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा ट्रक रस्त्यात उभा करावा लागतो. यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावरही परिणाम होतो.

कर्ज आणि आर्थिक आव्हाने

ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी महिन्याला ६८ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागतो. इतके उत्पन्न मिळत नसल्यामुळे कुटुंबाला पैशे देऊ शकत नाहीत, त्यामुळे कुटुंबच सोबत ठेवल्यामुळे पैशाची बचत होत असल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले. एकनाथ पवार सांगतात की, कधी कधी त्याच्यावर इतका मानसिक दबाव येतो की ते आत्महत्या करण्याचा विचारही करतात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ललिता पवार: ट्रक चालविणारी आणि मुलींना अभ्यासासाठी प्रेरित करणारी आई

Truck driver:ललिता पवार याही ट्रक चालवण्यात त्यांना साथ देतात. याशिवाय ती मुलींना अभ्यासासाठी प्रेरित करते. मात्र, रस्त्यावर राहून मुलींना शिक्षण देणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे ही आव्हाने वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment